Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र! > महाराष्ट्राविषयी विशेष > संदर्भ उद्योग > महामंडळे
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 

महामंडळे :
महाराष्ट्रात निरनिराळ्या उद्योगांचा विकास व्हावा यासाठी मंडळे व महामंडळे स्थापन करण्यात आली आहेत. उद्योगधंदे, वित्तपुरवठा, वस्त्रोद्योग, वखार, कृषी, पशु, यंत्रमाग, चित्रपट उद्योग, पर्यटन, गृहनिर्माण, मत्स्य व्यवसाय आदी विषयांशी निगडित मंडळे व महामंडळे त्या - त्या उद्योगासाठी कार्यरत आहेत.

महामंडळे - स्थापना वर्ष प्रमुख उद्देश
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ -
दिनांक १ ऑगस्ट, १९६२
राज्यातील अविकसित प्रदेशात उद्योगधंद्याची उभारणी करणे. उद्योगांसाठी मूलभूत सोयी-सुविधा पुरवणे.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ - दिनांक ३१ मार्च, १९६६ उद्योगधंद्यांचे विकेंद्रीकरण, कर्ज पुरवठा, तांत्रिक मार्गदर्शन करणे.
महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ -
दिनांक१ एप्रिल, १९६२
छोट्या व मध्यम उद्योगांना भूखंड, इमारती, यंत्रसामग्रीसाठी कर्ज देणे, सवलती देणे.
महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ - १९६२ लघु उद्योगांना कच्चा माल पुरवणे, मालाच्या विक्रीची व्यवस्था लावणे, गोदामांची व्यवस्था करणे, हस्तकला उद्योगास चालना देणे, माल निर्यातीस साहाय्य करणे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन - १९७८ राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचा समतोल विकास साधणे, या क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देणे, प्रशिक्षण देणे.
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ - १९६२ याअंतर्गत ९८ उद्योगांचा समावेश आहे. ग्रामोद्योगांना उत्तेजन व प्रोत्साहन देणे, व्यक्तिगत कारागीर, उद्योजक यांना भाग भांडवल, खेळते भांडवल यासाठी अर्थसाहाय्य देणे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - १९७५ पर्यटन उद्योगाच्या सर्वांगीण विकासाकरिता कार्य करणे.

याशिवाय चार विभागीय विकास महामंडळे त्या त्या विभागाच्या आर्थिक विकासासाठी, तेथील उद्योजकांना सोयी-सवलती मिळाव्यात याकरिता स्थापन करण्यात आली आहेत.
१) कोकण विकास महामंडळ २) पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळ ३) मराठवाडा विकास महामंडळ ४) विदर्भ विकास महामंडळ

यांसारख्या मंडळ / महामंडळांकडून शासनाच्या वतीने उद्योगधंद्यात वाढ होऊन रोजगार निर्मितीस चालना मिळावी याकरिता प्रयत्न होत आहेत

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) :
कमी प्रमाणात औद्योगीकरण झालेल्या भागांमध्ये उद्योग उभारणीस उद्योगांना व उद्योजकांना चालना, प्रोत्साहन देणे आणि त्या योगे त्या भागाचा विकास करणे व रोजगार निर्माण करणे, तसेच उद्योगांसाठी कर्ज व अनुदान देणे, उद्योजकांना स्वस्त दरात भू-खंड, तयार गाळे उपलब्ध करून देणे, औद्योगिक क्षेत्रात रस्ते, पाणी पुरवठा, वीज व इतर आवश्यक सुविधा पुरवणे- याकरिता राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( MIDC) दिनांक १ ऑगस्ट, १९६२ रोजी स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाच्या क्षेत्रांतील उद्योगांची, गुंतवणुकीची व उपलब्ध रोजगाराची आकडेवारी पुढे दिली आहे.

राज्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास मंडळ क्षेत्रांची माहिती (३१ मार्च, २००७ रोजी)

प्रदेश औद्योगिक क्षेत्रे मोठी औद्योगिक क्षेत्रे लहान औद्योगिक क्षेत्रे विकास केंद्रे औद्योगिक क्षेत्रे एकूण
बृहन्मुंबई
कोकण २४ ३* ३२
नाशिक १० ११* ३०
पुणे २९ १८ १९ ६६
औरंगाबाद १६ २० १२* ४८
अमरावती ३२ ८* ४७
नागपूर ११ २५ १०* ४६
एकूण ९८ १०९ ६३ २७०

* केंद्र शासनाकडून यापैकी प्रत्येकी एक विकास केंद्र विकसित करण्यात येत आहे.
(संदर्भ - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-२००९)

राज्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास मंडळ क्षेत्रांची माहिती (३१ मार्च, २००८ रोजी)

उद्योग घटकांची संस्था, गुंतवणूक व रोजगार.

प्रदेश उद्योग घटक संख्या उद्योग घटक गुंतवणूक (कोटी रुपये) उद्योग घटकरोजगार
बृहन्मुंबई ३०५ १,३०० १,३५,०००
कोकण १०,०४५ ११,८९१ २,३३,२७०
नाशिक ५,६१६ २,१७६ ४९,१५६
पुणे ८,४१६ १२,०८९ २,६८,५३२
औरंगाबाद ४,२१४ १,२५७ ५०,६३३
अमरावती १,३२८ ४५२ १७,५३२
नागपूर २,२५४ ७,८६० ६६,६००
एकूण ३२,१७८ ३७,०२५ ८,२०,७२३
(संदर्भ - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-२००९)

राज्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास मंडळ क्षेत्रांची माहिती (३१ मार्च, २००८रोजी)

भूखंडांची माहिती

प्रदेश भूखंडांची संख्या विकसित भूखंडांची संख्या वितरित
बृहन्मुंबई ३५७ ३४९
कोकण १७,००० १५,१८९
नाशिक ८,७७२ ७,९६२
पुणे १५,०६७ १३,४३०
औरंगाबाद ९,४१० ८,३५६
अमरावती ४,४६२ ३,१३९
नागपूर ५,६६० ४,७७०
एकूण ६०,७२८ ५३,१९५

(संदर्भ - महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २००८-२००९) 

 इतिहास | भूगोल | महाराष्ट्रातील शेती | उद्योग | तीर्थक्षेत्रे | पर्यटन स्थळे | मराठी भाषेचा इतिहास | साहित्य | संगीत | नाटक | चित्रपट | चित्रकला | शिल्पकला | लोककला | सण - उत्सव | महाराष्ट्र गीते | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |